Contact Banner

प्रेमसंबंधाच्या वादातून दोन भावंडांवर कारने उदळी बुद्रुक येथे जीवघेणा हल्ला; आरोपी पोलिस कोठडीत

 

Accused in fatal attack on two siblings over love dispute in Udali Budruk, in police custody


प्रेमसंबंधाच्या वादातून दोन भावंडांवर कारने उदळी बुद्रुक येथे जीवघेणा हल्ला; आरोपी पोलिस कोठडीत 


Accused in fatal attack on two siblings over love dispute in Udali Budruk, in police custody




लेवाजगत न्यूज सावदा रावेर (जि. जळगाव) :-उदळी बुद्रुक शिवारात प्रेमसंबंधाच्या वादातून झालेल्या हल्ल्यात दोन भावंड गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



फिर्यादी गौरव सुरेश पाटील (वय २०, धंदा-शेती, रा. उदळी बु।।, ता. रावेर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा धाकटा भाऊ कुणाल याचे आरोपी गोपी उर्फ सुशील सुभाष पाटील (रा. उदळी बु।।) याच्या भावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याचा राग आरोपीच्या मनात असल्याने त्याने पांढऱ्या रंगाची कार घेऊन फिर्यादी व त्याचा भाऊ कुणाल हे मोटारसायकलवरून शेतात जात असताना जाणीवपूर्वक समोरून धडक दिली. यात दोघेही जखमी झाले. इतकेच नव्हे तर आरोपीने कार रिव्हर्स घेऊन पुन्हा दोघांना ठार मारण्याच्या उद्देशाने धडक दिली.

जखमींना तात्काळ फैजपूर येथील डॉ. खाचणे यांच्या आशिर्वाद रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गौरव पाटील यांचा उजवा हात मोडला आहे. दोघांवर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्र. 217/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सदर प्रकरणाचा तपास सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल शिवाजी सानप करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.