शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा मोहमांडली येथे पेन वाटप
शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा मोहमांडली येथे पेन वाटप
लेवाजगत न्यूज मोहमांडली (ता. रावेर) :-शिक्षक दिनाचे औचित्य साधून जुम्मा तडवी (युवा स्वयंसेवक तथा ग्रामपंचायत सदस्य – मोहमांडली व भिम आर्मी रावेर तालुका उपाध्यक्ष) यांनी जिल्हा परिषद शाळा मोहमांडली येथे विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना पेन वाटप करून आपुलकीचा अनोखा सामाजिक उपक्रम राबविला.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक विनोद बाविस्कर व शिक्षक विनोद पाचपोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पेन वाटप करून जुम्मा तडवी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत अभ्यासात प्रगती करण्याचे आवाहन केले.
“पेन हेच विद्यार्थ्यांच्या हातातलं खरं शस्त्र आहे. या शस्त्राच्या जोरावरच तुम्ही भविष्य घडवू शकता.” – जुम्मा तडवी
या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत