Contact Banner

अंबरनाथ युवा समितीतर्फे आयुष्मान भारत कार्ड आरोग्य योजना मोफत शिबिर

 

अंबरनाथ युवा समितीतर्फे आयुष्मान भारत कार्ड आरोग्य योजना मोफत शिबिर


अंबरनाथ युवा समितीतर्फे आयुष्मान भारत कार्ड आरोग्य योजना मोफत शिबिर

लेवा जगत न्यूजअंबरनाथ : अंबरनाथ युवा समितीच्या वतीने प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य योजना मोफत शिबिराचे आयोजन यश टेक सर्विसेस (भरत महाजन यांच्या दुकानात) करण्यात आले. यावेळी युवा समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन समिती प्रमुख मयुरेश कोल्हे यांच्या हस्ते झाले तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

या प्रसंगी माजी नगरसेवक संजय आदक, बांधकाम व्यावसायिक विजय वराडे, डॉ. कुणाल चौधरी, लेवा मंडळ सचिव अनिल झोपे, राजेंद्र झोपे, संजय कोल्हे, दीपक अत्तरदे, देविदास पाटील, प्रकाश इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. युवा समितीचे शहराध्यक्ष प्रशांत पाटील, कार्याध्यक्ष किरण नेमाडे, सचिव स्मिता चौधरी तसेच पदाधिकारी मीनाक्षी नारखेडे, भरत महाजन, दीपक वारके, चेतन चौधरी, मनोज चौधरी, गणेश सरोदे, पूनम सरोदे, वैशाली पाटील, योगिता अत्तरदे, निलेश झांबरे, शुभांगी महाजन, निधी अत्तरदे, जीवराम तळेले, भावना पाटील यांसह असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिराचा एकूण ४५ नागरिकांनी प्रत्यक्ष लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आई जोगेश्वरी इंटरप्राईसेस आणि विद्या झांबरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

      “आरोग्य हेच खरे धन! समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे हीच खरी सेवा आहे. आयुष्मान भारत योजना सारख्या उपक्रमांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनी घेऊन आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचे संरक्षण करावे. समाजाने एकत्र येऊन अशा शिबिरांना प्रोत्साहन दिले तर आरोग्यदायी आणि सशक्त अंबरनाथ घडविणे शक्य होईल,” असे आयोजकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.