अभियंता दिनानिमित्त कनिष्ठ अभियंता आदिल हाजी मुस्तफा तडवी यांचा सत्कार
अभियंता दिनानिमित्त कनिष्ठ अभियंता आदिल हाजी मुस्तफा तडवी यांचा सत्कार
लेवा जगत न्यूज फैजपूर : १५ सप्टेंबर २०२५ रोजी अभियंता दिनानिमित्त कनिष्ठ अभियंता आदिल हाजी मुस्तफा तडवी यांना उत्कृष्ट कार्य व यशस्वी कामगिरीबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव यांच्या हस्ते सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
कनिष्ठ अभियंता आदिल तडवी हे माजी नगरसेवक मरहुम नजीर बलदार तडवी यांचे नातू, हाजी मुस्तफा नजीर तडवी (सर) यांचे चिरंजीव तसेच लोकमत समाचार फैजपूरचे पत्रकार राजू तडवी यांचे पुतणे आहेत. त्यांच्या या सन्मानामुळे तडवी समाजासह तडवी टायगर ग्रुप, फैजपूर वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत