Contact Banner

शवविच्छेदन अहवालातून यावलच्या 'त्या' पाचवर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड-पोक्सोचे कलम वाढवले

  

Autopsy report reveals sexual assault on 'that' five-year-old boy in Yaval, POCSO section extended


शवविच्छेदन अहवालातून यावलच्या 'त्या' पाचवर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड-पोक्सोचे कलम वाढवले

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी यावल-शहरातील बाबुजीपूरा भागातील पाच वर्षीय बालकाची हत्या करण्यापूर्वी त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. त्यामुळे मारेकरी २२ वर्षीय तरुणाविरुद्ध बालकाच्या लैंगिक अत्याचाराच्या कलमाची वाढ केली आहे.


    बाबुजीपूरा भागातील पाच वर्षीय बालक मोहंमद हन्नान खान हा शुक्रवारी (दि.५) बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह शेजारी राहणाऱ्या शेख शाहीद शेख बिस्मिल्ला या तरुणाच्या घरात आढळून आला होता. या तरुणाच्या वडीलांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर संबंधित तरुणाची घटनेची कबुली दिली. त्याने मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह जाळला. तो एका गोणीत लपवला होता. त्याची विल्हेवाट लावण्यापूर्वीच घटना उघडकीस आली. लैंगिक अत्याचारातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला होता. तो खरा ठरला. शवविच्छेदन अहवालातही हेच कारण नमूद करण्यात आले आहे. नुकताच पोलिसांना हा अहवाल प्राप्त झाला आहे. संबंधित तरुणाच्या घरी घटना उघडकीस आली तेव्हाच पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्याचे कलम लावण्यात आले होते. आता बालकाच्या लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा पोक्सो अन्वये कलमाची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीला १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत. तपास डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.