धनाजी नाना महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात शिक्षक दिन उत्साहात साजरा
धनाजी नाना महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात शिक्षक दिन उत्साहात साजरा
लेवाजगत न्यूज फैजपूर : धनाजी नाना महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागात शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघूळदे यांनी भूषविले.
यावेळी प्राचार्य डॉ. वाघूळदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यापीठ स्तरावरील वक्तृत्वस्पर्धेत भाग घेणाऱ्या आणि नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च महाविद्यालय उचलणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शिस्तपालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमात विद्यार्थीनींनी शिक्षक दिनाचे महत्त्व उलगडून सांगितले व मनोगते व्यक्त केली. ग्रंथपाल गायकवाड सरांनी “ग्रंथांचे महत्त्व” या विषयावर प्रभावी भाषण केले. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. राजेंद्र राजपूत यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले, तर विभागप्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्रा. नयना पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश वाघ यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्वेता भालेराव हिने मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत