Header Ads

Header ADS

चिनावल येथील नूतन आयटीआयचे घवघवीत यश

 

Chinaval-new-ITI-successful-resounding

चिनावल येथील नूतन आयटीआयचे घवघवीत यश 

लेवाजगत न्यूज चिनावल (ता. रावेर) : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिनावल यांचा सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षाचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत एकूण ७५ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी ७१ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. संस्थेचा निकाल तब्बल ९४.६६ टक्के लागला आहे.

गुणवंत विद्यार्थी :

  • फिटर (द्वितीय विभाग): जयेश मानकरे (८६%), गिरीश नेहेते (८५%), विश्वजीत नवले (८१%)
  • इलेक्ट्रिशियन (द्वितीय विभाग): युधिष्ठीर चौधरी (८८%), मिलिंद नारखेडे (८६%), हितेश कोळी (८६%)
  • फिटर (प्रथम विभाग): नीरज सपकाळे (८४%), महेंद्र भालेराव (८४%), अजय सोनवणे (८०%)
  • इलेक्ट्रिशियन (प्रथम विभाग): ओम पाटील (८९%), प्रीतम महाजन (८६%), मयूर चौधरी (८४%)
  • विद्यार्थिनींत: योगिता सपकाळे हिने ८६% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.

निकालाबाबत संस्थेचे अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष राजेंद्र फालक, चेअरमन खेमचंद पाटील, सेक्रेटरी गोपाळ पाटील तसेच कार्यकारिणी सदस्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Chinaval-new-ITI-successful-resounding


प्राचार्य संदीप चौधरी म्हणाले :
"आमचे निदेशक व प्रशिक्षणार्थ्यांनी घेतलेली कठोर मेहनत व आत्मसात केलेले कौशल्य यामुळे हे घवघवीत यश प्राप्त झाले. लवकरच द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांना पुणे येथील टाटा मोटर्स, बजाज यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये पाठविण्यात येणार आहे. तसेच गव्हर्नमेंट रेल्वे, आयुध फॅक्टरी, वीज वितरण कंपनी आदी सेवांसाठी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे."


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.