निधन वार्ता-मनोहर गिरधर चौधरी
निधन वार्ता-मनोहर गिरधर चौधरी
लेवाजगत न्यूज पिळोदे बु. (ता. यावल) – येथील रहिवासी व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मनोहर गिरधर चौधरी वय 84 वर्ष यांचे दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1.30 वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज रविवार संध्याकाळी4 वाजता त्यांच्या राहत्या घरून पिळोदे बु. येथून निघणार आहे.
चौधरी यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली होती. ते पिळोदा गावाचे माजी सरपंच, विकास सोसायटीचे माजी चेअरमन, तसेच पाडळसा लोक विद्यालय शाळेचे माजी संचालक म्हणून कार्यरत होते. गावाच्या विकासकामांत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
त्यांच्या पश्चात आप्तेष्ट परिवार असून ते पिळोदे बु. येथील उपसरपंच धीरज मनोहर चौधरी यांचे वडील होत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत