Header Ads

Header ADS

शासकीय कार्यालयात ‘२८ सप्टेंबर’ माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी







शासकीय कार्यालयात ‘२८ सप्टेंबर’ माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी



शासकीय कार्यालयात ‘२८ सप्टेंबर’ माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

चोपडा (प्रतिनिधी) – नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम तसेच जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे ई-मेलद्वारे निवेदन सादर करून शासकीय कार्यालयांत २८ सप्टेंबर हा दिवस ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना महाराष्ट्र राज्य आणि ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांनी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, माहिती अधिकार हा कायदा नागरिकांना हक्क प्रदान करणारा अत्यंत महत्त्वपूर्ण कायदा असून त्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी शासकीय आस्थापनांनी सक्रिय भूमिका घ्यावी.

आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनानेदेखील शासन निर्णय क्र. केमाअ २००८/पत्र क्र. ३७८/०८/सहा, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई, दिनांक २० सप्टेंबर २००८ अन्वये हा दिवस दरवर्षी शासकीय कार्यालयात साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानुसार शासकीय कार्यालयांत माहिती अधिकार या विषयावर व्याख्यानमाला, चर्चासत्र, प्रश्नमंजुषा, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, माहिती अधिकार अधिनियमावर आधारित प्रदर्शन आदी उपक्रम राबविणे तसेच स्थानिक सामाजिक संस्था, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग घ्यावा, असे शासनाने सुचविले आहे.

या वर्षी २८ सप्टेंबर रोजी रविवार आणि २७ सप्टेंबर रोजी शनिवार असल्याने सुट्टी येत आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करणे शक्य नसल्यास तो २६ सप्टेंबर किंवा २९ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात यावा, अशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयांना तातडीने द्याव्यात, अशी मागणीही गायकवाड यांनी केली आहे.

✍🏻 लेवा जगत न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.