Contact Banner

धोबी समाजाची आरक्षणाबाबत इशारावजा भूमिका मंत्री-आमदारांचे कपडे धुणे बंद करू – नॅशनल धोबी महासंघ

Dhōbī-samājācī-ārakṣaṇābābata-iśārāvajā- bhūmikā-


धोबी समाजाची आरक्षणाबाबत इशारावजा भूमिका

मंत्री-आमदारांचे कपडे धुणे बंद करू – नॅशनल धोबी महासंघ

लेवाजगत न्यूज पुणे –
नॅशनल धोबी महासंघ आणि एकता बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी धोबी समाजाला १९६० पूर्वीचे अनुसूचित जाती (SC) मधील आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी पूर्ण न झाल्यास मंत्री, आमदार आणि खासदारांचे कपडे धुणे बंद करण्याचा निर्वाणीचा इशारा धोबी समाजाने दिला.

या पत्रकार परिषदेला नॅशनल धोबी महासंघाचे राष्ट्रीय प्रमुख महासचिव अनिल शिंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक गणेश चुन्नीलाल परदेशी, राष्ट्रीय सचिव राज छोटेलाल परदेशी, प्रदेशाध्यक्ष प्रा. अनिल मोरे, प्रदेश कार्याध्यक्ष अशोक चौधरी, उपाध्यक्ष राजन चौधरी, कायदे सल्लागार आकाश काळे, अॅड. संतोष शिंदे, अॅड. प्रदीप माने, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री आदमाने तसेच एकता बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष किशोर परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.