जे.टी.महाजन इंजिनीअरिंग कॉलेजात अभियंता दिन साजरा,भारताच्या औद्योगिक आणि डिजिटल भविष्याला आकार देण्यात भावी अभियंताची महत्त्वाची भूमिका – इंजि. नितीन फिरके यांचे प्रतिपादन
भारताच्या औद्योगिक आणि डिजिटल भविष्याला आकार देण्यात भावी अभियंताची महत्त्वाची भूमिका – इंजि. नितीन फिरके यांचे प्रतिपादन
जे.टी.महाजन इंजिनीअरिंग कॉलेजात अभियंता दिन साजरा
लेवा जगत न्यूज फैजपूर :-जे.टी. महाजन इंजिनीअरिंग कॉलेजात १५ सप्टेंबर २०२५ रोजी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रणेते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त तसेच तंत्रवैद्यक शिक्षण मंडळ संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष व माजी अध्यक्ष स्व. दिगंबर शेठ नारखेडे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी प्रज्ञा पिहुल हिने सर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून अभियंता दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्रिमूर्ती इरिगेशनचे संस्थापक सदस्य व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी इंजि. नितीन फिरके उपस्थित होते. त्यांनी अभियंता दिन २०२५ ची संकल्पना “डीप टेक अँड इंजिनिअरिंग एक्सलन्स: ड्रायव्हिंग इंडियाज टेकएड” या विषयावर मार्गदर्शन केले. भारताच्या औद्योगिक आणि डिजिटल भविष्याला आकार देण्यात भावी अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. सेमीकंडक्टर डिझाइन, शाश्वत पायाभूत सुविधा, एआय, रोबोटिक्स आणि हरित तंत्रज्ञान या क्षेत्रात अभियंते परिवर्तनाचे पथदर्शी आहेत. “नवीन सखोल तंत्रज्ञान आत्मसात करून अभियांत्रिकीमध्ये उत्कृष्टता आणल्यास भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करू शकेल,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
उपप्राचार्य डॉ. जी.ई. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “अभियांत्रिकी विद्यार्थी म्हणून तुम्ही नवनवीन उपक्रमांना आकार द्या, समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील रहा. आव्हानांना सामोरे जाऊन देशाच्या विकासासाठी योगदान द्या. उत्कृष्टता मिळवा आणि सकारात्मक बदल घडवण्यासाठी तुमची कौशल्ये वापरा.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाची विद्यार्थिनी हिरल पाटील हिने केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, मार्तंड भिरुड, सचिव विजय झोपे व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाला प्र. प्राचार्य डॉ. के.जी. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी.ई. चौधरी, सर्व विभाग प्रमुख डॉ. डी.ए. वारके, प्रा. डी.आर. पाचपांडे, प्रा. ओ.के. फिरके, डॉ. के.एस. भगत उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत