Header Ads

Header ADS

शिमला येथे भीषण अपघात : जळगावच्या सौ. लक्ष्मी विराणी यांचे निधन


Jalgaon's Lakshmi Virani dies in horrific accident in Shimla


शिमला येथे भीषण अपघात : जळगावच्या सौ. लक्ष्मी विराणी यांचे निधन

लेवाजगत न्यूज शिमला/जळगाव- हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यात हिंदुस्तान-तिबेट मार्गावरील बिथल (कालीमिट्टी) परिसराजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात जळगाव (महाराष्ट्र) येथील सौ. लक्ष्मी विराणी यांचे अकाली निधन झाले. मुसळधार पावसामुळे डोंगरावरून घसरलेले प्रचंड दगड खासगी बसवर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.


Jalgaon's Lakshmi Virani dies in horrific accident in Shimla


बसवर कोसळले प्रचंड दगड
सोमवारी सकाळच्या सुमारास हिंदुस्तान-तिबेट मार्गावरून खासगी बस बिथल परिसरातून जात असताना डोंगरावरून अचानक दगड घसरून थेट बसवर कोसळले. या घटनेमुळे बसचे मोठे नुकसान झाले. प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला व जागोजागी भीषण दृश्य दिसून आले.

त्वरित बचावकार्य, जखमींना उपचार
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिस व बचाव पथकांना खबर दिली. काही मिनिटांतच पथक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले व त्यांना महात्मा गांधी वैद्यकीय सेवा केंद्र, खानरी (रामपूर उपजिल्हा) येथे तातडीने दाखल करण्यात आले. मृतदेह रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून वैद्यकीय नियमांनुसार उद्या सकाळी शवविच्छेदन होणार आहे. त्यानंतर सौ. विराणी यांचा मृतदेह त्यांच्या कार्यस्थळी सहकारी श्री. तरुण रामचंदानी यांच्या ताब्यात देण्यात येईल.

प्रशासनाचा तातडीने समन्वय
अपघाताची माहिती मिळताच जळगाव जिल्हा प्रशासनाने शिमला जिल्हा प्रशासन तसेच हिमाचल प्रदेश शासनाशी तातडीने संपर्क साधला. मृतदेह व जखमींच्या उपचाराबाबत आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात आली.

जळगावमध्ये शोककळा
सौ. लक्ष्मी विराणी यांच्या निधनाने जळगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईक, मित्रपरिवार व सहकाऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.