महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी
वराडसिम (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व झुंजार लेवा ग्रुप वराडसिम यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा ३६९ नागरिकांनी लाभ घेतला. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले.
शिबिरामध्ये रक्तदाब, डायबिटीस, शुगर तपासणी, कार्डिओग्राम (ईसीजी) यासह विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. रुग्णांची तपासणी करण्यासाठी भुसावळ येथील श्री हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व नेत्रम हॉस्पिटलचे प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर डॉ. मेश्राम व डॉ. मनीष रगडे यांनी उपस्थित राहून रुग्णांचे मार्गदर्शन केले.
शिबिराचे उद्घाटन नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर डॉक्टरांचे महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या उपक्रमासाठी महासंघाचे खान्देश विभाग संघटक श्री. विनीत पाटील (हबर्डिकर), पदाधिकारी धीरज बऱ्हाटे, गाव प्रमुख पराग भारंबे, अनिकेत ढाके, सागर काळे, त्रृशाल खाचणे, ज्ञानराज काळे, दीपक वाणी, गौरव पाचपांडे, जयेश भारंबे तसेच झुंजार लेवा ग्रुप व महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ, वराडसिम चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या मोफत आरोग्य शिबिराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत