संकट काळात सुरू केलेले शिक्षणाचे ऑनलाइन आंदोलन, आज बनलेय हजारो विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण,कोरोनाच्या काळात सुरू झालेला प्रकाशपुंज — सौ. गायत्री नेमाडे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान
कोरोनाच्या काळात सुरू झालेला प्रकाशपुंज — सौ. गायत्री नेमाडे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान
संकट काळात सुरू केलेले शिक्षणाचे ऑनलाइन आंदोलन, आज बनलेय हजारो विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण
लेवाजगत न्यूज सावदा (ता. रावेर, जि. जळगाव) :
कोरोना काळात शैक्षणिक उपक्रम ठप्प झालेले असताना सावदा येथील सौ. गायत्री ईश्वरदास नेमाडे यांनी “दुर्गाज स्कॉलर ऑनलाईन क्लासेस” या उपक्रमाची सुरुवात केली. आज हा उपक्रम राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे.
सौ. नेमाडे यांना 26 वर्षांचा समृद्ध मार्गदर्शनाचा अनुभव असून त्यांनी शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, नवोदय, मंथन, लक्ष्यवेध, BDS, ओलंपियाड, NMMS, MTSE, अभिरूप, TET, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवा भरती व MPSC अशा विविध परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत 150 हून अधिक विद्यार्थी नवोदय व सैनिक स्कूलमध्ये निवडले गेले आहेत.
2024-25 शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती निकालात दुर्गाज स्कॉलर क्लासेसचे 15 विद्यार्थी मेरिट यादीत स्थान मिळविण्यात यशस्वी झाले असून 70 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. यामध्ये आठवीतील विद्यार्थिनी कु. सारा योगेश कोल्हे (जळगाव, ता. रावेर) हिची राज्य मेरिटमध्ये निवड झाली आहे.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी (2024-25)
पाचवी शिष्यवृत्तीधारक:
- स्वामिनी गणपत कांबळे – बीड (264)
- शौर्यन संदीप गाढवे – सातारा (254)
- यशश्री प्रशांत देशमुख – अहिल्यानगर (254)
- यशराज सुधाकर चव्हाण – सातारा (252)
- वैष्णवी सुरेश माळी – सातारा (250)
- शताक्षी विनायक घायाळ – बीड (248)
- आदित्य अरुण कुंडाळे – सांगली (246)
- तपस्या मनोज कोरडे – अहिल्यानगर (246)
- श्रेयस सखाराम थांगे – संभाजीनगर (244)
- नवमी महेंद्र गुल्हाने – अमरावती (180)
आठवी शिष्यवृत्तीधारक:
- कु. सारा योगेश कोल्हे – जळगाव (ता. रावेर) – National Rural Merit
- रुद्र सचिन बर्गे – पुणे (236) – जिल्हा मेरिट
- साईगंधा तानाजी जामदार – सोलापूर (194) – जिल्हा मेरिट
याशिवाय एकूण 70 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
यशाची गाथा
आजपर्यंत 300 विद्यार्थ्यांना NMMS शिष्यवृत्ती (₹48,000/-) तसेच अनेकांना सारथी शिष्यवृत्ती (₹38,400/-) लाभली आहे. याशिवाय कोविड काळातील पहिल्या बॅचमधील विद्यार्थी आज जेईई व एमएचटी सीईटी परीक्षेत 89.50 ते 99.75 पर्सेन्टाईल्स मिळवून यशस्वी झाले आहेत.
माफक फी व दर्जेदार शिक्षण
स्पर्धा परीक्षांच्या क्लासेससाठी इतर ठिकाणी 15 ते 25 हजार रुपये शुल्क आकारले जात असताना, सौ. नेमाडे यांनी सर्वसामान्य पालकांना परवडेल अशी माफक फी ठेवून शिक्षण सर्वांसाठी खुले केले आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना समजावून देण्यासोबत शॉर्ट ट्रिक्स व वैदिक गणिताच्या साहाय्याने जलद सोडवणुकीचे कौशल्य विकसित केले जाते.
डिजिटल प्रसार
ऑनलाईन शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी @mathsguide5 व @mamthan_exam या यूट्यूब चॅनल्सवर 600 हून अधिक शैक्षणिक व्हिडिओज अपलोड केले आहेत. यात शालेय तसेच स्पर्धा परीक्षांचे सुगम मार्गदर्शन केले जाते.
“ज्ञानदीप विझू नये म्हणून अविरत प्रयत्न करणाऱ्या सौ. गायत्री नेमाडे यांचे कार्य आज राज्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे,” अशा भावना पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत