जे.टी.महाजन पॉलिटेक्निक कॉलेज, फैजपूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
जे.टी.महाजन पॉलिटेक्निक कॉलेज, फैजपूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
फैजपूर (लेवाजगत न्यूजप्रतिनिधी) :
न्हावी मार्गावरील जे. टी. महाजन पॉलिटेक्निक कॉलेज येथे ४ सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी भावस्पर्शी व प्रेरणादायी भाषणे सादर केली. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत “विद्यार्थी-शिक्षक” म्हणून मार्गदर्शन केले, ज्यामुळे या विशेष दिनाचे अनोखे स्वरूप खुलले.
या प्रसंगी सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य व विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांप्रती आदर, कृतज्ञता आणि प्रेरणा व्यक्त करण्याची सुंदर संधी ठरला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत