सावदा येथिल जाम मोहल्ला परिसरातील कर आकारणी पुन्हा करण्यात येणार -सहाय्यक संचालक तायडे साहेबांचे निर्देश
सावदा येथिल जाम मोहल्ला परिसरातील कर आकारणी पुन्हा करण्यात येणार -सहाय्यक संचालक तायडे साहेबांचे निर्देश
लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी):-सावदा येथील जाम मोहल्ला,ख्वाजा नगर परिसरातील रहिवाशांनी, माननीय नगरसेवक फिरोज खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक संचालक दिघेश तायडे यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात नमूद करण्यात आले की, या परिसरातील बहुतांश घरे अत्यंत जुनी असून मातीपासून बांधलेली आहेत तसेच अनेक घरांवर २५ ते ३० वर्षांपूर्वीचे टिनशेड आहेत. इतकेच नव्हे तर, नगरपालिकेकडून या भागात कोणत्याही प्रकारच्या मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.
या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी सर्व कर जुनी बांधकाम दराने आकारण्यात यावेत, अशी मागणी केली.
ही बाब लक्षात घेत, सहाय्यक संचालक तायडे साहेब यांनी तत्काळ नगरपालिकेचे कर निरीक्षक चौधरी व ठोसरे साहेब यांना संबंधित परिसराची कर आकारणी नव्याने करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यांनी “जाम मोहल्ला परिसरातील जुन्या बांधकामाचा विचार करूनच नवीन कर आकारणी तयार करावी आणि त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा,” अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत