सावदा येथील मेहेक फिरोज खान पठाण हिची उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी
सावदा येथील मेहेक फिरोज खान पठाण हिची उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी
लेवाजगत न्यूज, सावदा : सावदा शहरातील कन्या व माजी नगरसेवक फिरोज खान हबीबुला खान पठाण यांची सुपुत्री मेहेक फिरोज खान पठाण हिने शैक्षणिक क्षेत्रात घवघवीत यश संपादन करत आपल्या कुटुंबासह संपूर्ण शहराचा गौरव वाढविला आहे.
मेहेक हिने मास्टर ऑफ फार्मसी (M.Pharm) या पदव्युत्तर अभ्यासक्रमात औषध रसायनशास्त्र विभागातून 9.06 सीजीपीए व 85.81 टक्के गुणांसह डिस्टिंक्शनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीमुळे तिला कॉलेज टॉपर होण्याचा मान मिळाला असून तिच्या यशाने सावदा शहराचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
ही गुणवंत विद्यार्थिनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या फैजपूर येथील तापी व्हॅली एज्युकेशन सोसायटी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी येथे शिक्षण घेत होती.
तिच्या या उत्तुंग यशाबद्दल सावदा व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, समाजातील विविध मान्यवर, मित्रपरिवार व शिक्षकवर्ग यांच्याकडून शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.
मेहेक हिच्या यशामुळे सावदा शहरातील युवक-युवतींना प्रेरणादायी दिशा मिळाली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी ‘लेवाजगत न्यूज परिवार’ तर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत