Contact Banner

मोठी बातमी! महाराष्ट्रात 'कोल्ड्रिफ' सिरपवर बंदी

  

मोठी बातमी! महाराष्ट्रात 'कोल्ड्रिफ' सिरपवर बंदी 


लेवाजगत न्यूज, मुंबई :
महाराष्ट्र सरकारने लहान बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. 'कोल्ड्रिफ' कफ सिरपवर तातडीने बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.

मध्य प्रदेशात या औषधामुळे विषबाधा होऊन अनेक चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर ही धक्कादायक कारवाई करण्यात आली. आतापर्यंत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 18 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात कोल्ड्रिफ सिरपच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
 सरकारने नागरिकांसाठी टोल-फ्री नंबर जारी केला आहे — कोणत्याही मेडिकलमध्ये हे सिरप आढळल्यास तात्काळ फोन करून माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

🔹 एफडीएचे सहआयुक्त मनीष चौधरी यांनी सांगितले की, नागपूरसह संपूर्ण राज्यात औषध तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
🔹 आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात हे सिरप सापडले नसले तरी सावधगिरी म्हणून नमुने प्रयोगशाळेत पाठवले गेले आहेत.
🔹 दोषी नमुने आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन :
👉 कोल्ड्रिफ सिरपचा वापर तात्काळ थांबवा.
👉 आपल्या परिसरातील औषध दुकाने तपासा आणि शंका आल्यास त्वरित प्रशासनाला कळवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.