जिल्ह्यात 16 ऑक्टोंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
जिल्ह्यात 16 ऑक्टोंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
लेवाजगत न्यूज जळगाव, दिनांक 1 ऑक्टोंबर (जिमाका) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 2 ऑक्टोंबर, 2025 ते 16 ऑक्टोंबर, 2025 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) (3) लागू जारी करण्यात आले आहे.
वरील कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश लग्न समारंभ व प्रेत यात्रा तसेच धार्मिक मिरवणूका यांना लागू राहणार नाही. असे वैशाली चव्हाण, अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत