Contact Banner

सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा; भाजपा तर्फे नंदाताई लोखंडे प्रबळ दावेदार

 




Savda-municipal-election-vigorous-discussion-Nandatai-Lokhande-strong-contender-on-BJP-side


सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा; भाजपा तर्फे नंदाताई लोखंडे प्रबळ दावेदार

लेवाजगत न्यूज, सावदा –सावदा नगरपालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांच्या कालखंडानंतर होणार असल्याची जोरदार शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या महिनाभरापासून निवडणुकीच्या प्रारूप आराखड्याला सुरुवात झाली असून, नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या प्रारंभी निवडणुकीची अधिकृत तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकीबाबत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतीय जनता पक्षाकडून या निवडणुकीत सौ. नंदाताई मिलिंद लोखंडे या प्रबळ दावेदार म्हणून समोर येत असून, त्या गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. भाजप पुरस्कृत सावदा विकास आघाडीकडून दोन वेळा उमेदवार राहिलेल्या आणि २०१६ च्या निवडणुकीत विजयी झालेल्या नंदाताई लोखंडे यांनी नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.

गोरगरीब जनतेशी असलेला संपर्क, विकासकामांचा अनुभव आणि पक्षनिष्ठा यामुळे त्या पुन्हा एकदा नगरपालिकेत प्रभावी नेतृत्व देऊ शकतील, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.