सावदा : शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाची निर्णायक बैठक ‘मशाल’ चिन्हावर लढण्याचा एकमताचा निर्णय
सावदा : शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाची निर्णायक बैठक ‘मशाल’ चिन्हावर लढण्याचा एकमताचा निर्णय
लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी) :- सावदा नगरपालिकेच्या २०२५ च्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महत्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीत निवडणुकीसंदर्भातील नियोजन, आघाडीची शक्यता आणि उमेदवार निश्चिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत ठरविण्यात आले की, जर महाविकास आघाडी संयुक्तपणे लढण्यास तयार असेल तर शिवसेना आघाडीमार्फत निवडणुकीत सहभागी होईल; अन्यथा पक्ष स्वतंत्ररित्या ‘मशाल’ या चिन्हावर उमेदवार उभे करेल, असा एकमताने निर्णय घेण्यात आला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख भरत नेहते, माजी नगरसेवक धनंजय (लाला) चौधरी, मिलिंद पाटील, शरद भारंबे, नीरज सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सावदा नगरपालिकेत होऊ घातलेल्या २०२५ च्या निवडणुकीत नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी राखीव असल्याने, पक्षाचे नियोजन त्या पद्धतीने करण्यात येणार आहे. तसेच या निवडणुकीत प्रभाग १० मधून २० नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने, संघटनात्मक स्तरावर तयारी सुरु झाली आहे.
पक्षाने यापुढे प्रत्येक प्रभागात जनसंपर्क वाढवून मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत