सावद्यात सुनिता गजानन ठोसरे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार — समाजसेवक गजू भाऊ ठोसरे यांच्या पत्नींची उमेदवारी जाहीर
सावद्यात सुनिता गजानन ठोसरे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार -समाजसेवक गजू भाऊ ठोसरे यांच्या पत्नींची उमेदवारी जाहीर
लेवाजगत न्यूज सावदा:- शहरातील परिचित सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्व गजानन नामदेव ठोसरे उर्फ गजू भाऊ ठोसरे यांच्या पत्नी सुनिता गजानन ठोसरे यांनी सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रांतून गजू भाऊ ठोसरे यांनी शहरात भरीव कार्य केले असून, त्यांच्या कार्याची पावती आणि जनतेत असलेला विश्वास लक्षात घेऊन त्यांच्या पत्नी सुनिता ठोसरे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
सुनिता ठोसरे या सावदा शहराच्या राजकारणात नवीन चेहरा असून त्यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. तथापि, पतीचे सामाजिक कार्य, नागरिकांशी असलेले आत्मीय संबंध आणि समाजसेवेची प्रेरणा यांच्या जोरावर त्या या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरल्या आहेत.
सध्या त्या कोणत्या पक्षाच्या तिकिटावर लढणार की अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार, याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत त्यांच्या पक्षनिशाणीबाबतच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
शहरात त्यांच्या उमेदवारीनंतर राजकीय चर्चांना उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सुनिता ठोसरे यांच्या उमेदवारीमुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत नवा उत्साह पाहायला मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत