धनाजी नाना महाविद्यालयात तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी
धनाजी नाना महाविद्यालयात तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी भूषविले, तर दे.ना.भोळे महाविद्यालय, भुसावळ येथील प्रा. डॉ. दयाघन राणे हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. या वेळी एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सतीश दत्तात्रय पाटील, सहायक कार्यक्रमाधिकारी प्रा. विकास वाघुळदे, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सविता कलवले तसेच एनएसएसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी आपल्या भाषणात तंबाखू सेवनामुळे समाजात वाढत चाललेल्या कॅन्सरच्या प्रादुर्भावाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आज तंबाखूमुळे युवा वर्गासह ज्येष्ठ नागरिकही गंभीर आजारांना बळी पडत आहेत. या संकटापासून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासूनच बदल घडवावा, असे त्यांनी एनएसएस स्वयंसेवकांना आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी एनएसएस स्वयंसेवकांना तंबाखूमुक्त समाज निर्मितीसाठी जनजागृती मोहीम राबवण्याचे आवाहन केले. “आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला तंबाखूच्या व्यसनापासून दूर करण्याचा संकल्प करा,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्वेता भालेराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कीर्ती महाजन, श्वेता भालेराव, अश्विनी पवार, प्रेरणा भालेराव, दीक्षा वानखेडे तसेच एनएसएसच्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
तंबाखूविरोधी जनजागृतीबरोबरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरणाने विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना जागृत झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत