ऐतिहासिक फैजपूरमध्ये आझाद हिंद स्थापना दिन साजरा-नेताजींना मानवंदना!
ऐतिहासिक फैजपूरमध्ये आझाद हिंद स्थापना दिन साजरा-नेताजींना मानवंदना!
फैजपूर वार्ताहर -हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामातील ‘आझाद हिंद सेने’च्या ८२व्या वर्धापन दिनानिमित्त, फैजपूर येथील सुभाष चौकात जयहिंद सैनिक संस्था आणि रामराज्य सेवाभावी संस्था यांच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
श्रीकृष्ण महानुभाव मंदिराचे मठाधिपती प. पु. राजधरबाबा पूजदेकर यांच्या हस्ते “एक दिवा राष्ट्रसमर्पणासाठी” या उपक्रमांतर्गत विधिवत पूजन, पणती प्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी राष्ट्रप्रेमी कार्यकर्त्यांनी नेताजींच्या पुतळ्याची झाडपूस व जलाभिषेक करून स्वच्छता मोहीम राबवली.
या वेळी जयहिंद सैनिक संस्थेचे पदाधिकारी जनार्दन जंगले यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रनिष्ठा जोपासण्यासाठी अशी समिती स्थापन करून हा उपक्रम सातत्याने राबविण्याचा मानस असल्याचे जयहिंद सैनिक संस्थेचे ज्येष्ठ पत्रकार संजय सराफ यांनी सांगितले. त्यांनी नगरपालिकेचा व लोकप्रतिनिधींचा दुर्लक्षपणा खेदाने व्यक्त केला.
दीपावलीच्या सणातही “राष्ट्र प्रथम” या भावनेने युवकांनी पुढाकार घेतला याचे कौतुक करत मठाधिपती राजधरबाबा म्हणाले, “आजच्या तरुणांकडून खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळते.”
कार्यक्रमास जयहिंद सैनिक संस्थेचे पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार संजय सराफ, व्ही. ओ. चौधरी सर, प्रा. यशवंत वारके, कला अविष्कारचे युवराज लोधी, रामराज्य संस्थेचे पदाधिकारी युवराज चौधरी, निलेश चौधरी, निलेश कोल्हे, भारती पाटील, वसंत पतदेशी, सुभाष पाटील, विनायक चौधरी, सुशील आणि सुशीला कापडे आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत