Header Ads

Header ADS

संतवाणी, आशीर्वचन आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण; भाविक भक्तांचा मोठा सहभाग, श्री स्वामिनारायण गुरुकुल सावदा येथे भव्य अन्नकूट सोहळा संपन्न!

 


shri-swaminarayan-gurukul-savda-annakut-mahotsav-2025   ---


श्री स्वामिनारायण गुरुकुल सावदा येथे भव्य अन्नकूट सोहळा संपन्न!


संतवाणी, आशीर्वचन आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण; भाविक भक्तांचा मोठा सहभाग


लेवाजगत न्यूज प्रतिनिधी सावदा -येथील श्री स्वामिनारायण गुरुकुल संस्था येथे सर्वावतारी भगवान श्री स्वामिनारायण यांच्या कृपेने आणि प.पू. धर्मधुरंधर १००८ आचार्यश्री राकेशप्रसादजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच संस्थेचे अध्यक्ष सद्गुरु शा. श्री भक्तिप्रकाशदासजी यांच्या प्रेरणेने अन्नकूट महोत्सव २०२५ भक्तिमय वातावरणात पार पडला.


मिती कार्तिक शु. १, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ (बुधवार) रोजी संपन्न झालेल्या या सोहळ्याची सुरुवात गोवर्धन पूजनाने झाली. हे पूजन सावदा येथील श्री स्वामिनारायण गुरुकुलचे मुख्याध्यापक संजय वाघुळदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर सर्व संतांच्या उपस्थितीत भगवंतांची मंगल आरती करण्यात आली.


यानंतर व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शास्त्री स्वामी अनंतप्रकाशदासजी (उपाध्यक्ष, श्री स्वामिनारायण गुरुकुल) यांनी भूषविले. या व्यासपीठावर कोठारी शास्त्री स्वयंप्रकाशदासजी, शास्त्री नवतमस्वामी (श्री स्वामिनारायण मंदिर, जळगाव),शास्त्री  विश्वप्रकाशदासजी ,भक्तिप्रियदासजी, महानुभाव पंथाचे राजधर शास्त्री बाबा, आमदार अमोलभाऊ जावळे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष धनंजय चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील (सावदा पोलीस ठाणे), संस्थेचे संचालक पी. डी. पाटील,फैजपूर चे माजी नगराध्यक्ष निलेश राणे व डॉ. संदीप पाटील (रावेर) यांच्यासह अनेक मान्यवर, संतवृंद आणि हरिभक्त उपस्थित होते. अण्णा कुठे कार्यक्रमासाठी दीपक भगत यांनी परिश्रम घेतले


प्रमुख संतांनी व व्यासपीठावरील मान्यवरांनी स्वामिनारायण भगवंतांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी संतवृंदांनी सर्व हरीभक्तांना अन्नकूटाचे महत्त्व सांगत धार्मिक संदेश दिला.


या कार्यक्रमात मुंबई येथील श्री स्वामिनारायण मंदिर भुलेश्वरचे सुप्रसिद्ध संत धर्मप्रसाददासजी — जे खानदेशी माऊली म्हणून ओळखले जातात — तसेच संस्थेचे अध्यक्ष सद्गुरु शा. श्री भक्तिप्रकाशदासजी यांनी दिवाळी व अन्नकूट महोत्सव निमित्त उपस्थित भक्तांना भ्रमणध्वनीद्वारे आशीर्वचन दिले.


आरतीनंतर सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादामध्ये पुरणपोळी, वांग्याची भाजी व मोहनथाळ असा स्वादिष्ट व पारंपरिक मेनू ठेवण्यात आला होता. सर्व उपस्थित भक्तगणांनी मोठ्या भक्तिभावाने प्रसादाचा लाभ घेतला.


या अन्नकूट महोत्सवात सावदा, यावल, रावेर, भुसावळ तसेच जळगाव तालुक्यातील मोठ्या संख्येने हरिभक्त, भगिनीवर्ग व भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला. संपूर्ण कार्यक्रमात भक्ती, श्रद्धा आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.