वाघोदा-थोरगव्हाण जिल्हा परिषद गटातून समाजहितासाठी सज्ज -प्रतिभाताई रमेश मोरे!
वाघोदा-थोरगव्हाण जिल्हा परिषद गटातून समाजहितासाठी सज्ज -प्रतिभाताई रमेश मोरे!
लेवा जगत न्यूज मस्कावद-वाघोदा/थोरगव्हाण : समाजातील अन्याय, महिलांवरील अत्याचार आणि लोकांच्या दैनंदिन समस्यांविरुद्ध नेहमीच अग्रभागी राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई रमेश मोरे आता वाघोदा-थोरगव्हाण जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी सज्ज झाल्या आहेत.
महिलांवर अन्याय झाला की सर्वात आधी धाव घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या प्रतिभाताईंनी अनेक ठिकाणी महिलांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी आंदोलन, मोर्चे, पोलीस ठाण्यांवर निवेदनं आणि अथक पाठपुरावा या सर्व माध्यमांतून समाजातील पीडित घटकांचा आवाज बनून काम केले आहे.
केवळ महिलांच्या प्रश्नांपुरतेच नव्हे, तर गाव, तालुका आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल्या आहेत. विकासकामांपासून सामाजिक प्रश्नांपर्यंत, लोकांच्या हक्कासाठी त्यांनी नेहमीच खंबीर भूमिका घेतली आहे.
“जनतेचा विश्वास, महिलांचा आधार – प्रतिभाताई मोरे आमच्या हक्काचा आवाज!”
अशा घोषणांनी परिसरातील वातावरण उत्साही झाले आहे.
स्वतः प्रतिभाताईंनी सांगितले की,
> “मी जिथे-जिथे सामाजिक कार्य केले आहे त्याचे सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत. मी प्रामाणिकपणे समाजासाठी कार्य करत राहणार आहे. माझ्या प्रत्येक कार्याची पावती मला समाजातूनच मिळाली आहे.”
त्यांच्या या सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळे, जिल्हा परिषद गटात त्यांच्या उमेदवारीबाबत जनतेत चर्चेला उधाण आले असून, समाजहितासाठी कार्य करणाऱ्या उमेदवार म्हणून त्या लोकांच्या अपेक्षेच्या केंद्रस्थानी आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत