Header Ads

Header ADS

सावद्यात स्वामीनारायण मंदिरात अन्नकुट महोत्सव संपन्न

सावद्यात स्वामीनारायण मंदिरात अन्नकुट महोत्सव संपन्न



सावद्यात स्वामीनारायण मंदिरात अन्नकुट महोत्सव संपन्न

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी, सावदा :दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने येथील श्री स्वामीनारायण मंदिरात २० ते २२ ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये बुधवारी साजरा झालेला अन्नकुट महोत्सव हा विशेष आकर्षण ठरला.

अन्नकुट महोत्सव हा स्वामीनारायण संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण सोहळा असून, गोवर्धन पूजनाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण महाराज व श्री राधाकृष्णदेव यांना ५६ भोग नैवेद्य दाखवले जातात. या पवित्र परंपरेनुसार बुधवारी सकाळी मंदिरात विधिवत अन्नकुट आरती पार पडली.

या प्रसंगी गोवर्धन पूजन विधी शास्त्री विश्वप्रकाशदासजी यांच्या हस्ते संपन्न झाला. पौराहित्य राजेंद्र जोशी यांनी केले. त्यानंतर शास्त्री भक्तीप्रियदासजी आणि शास्त्री विश्वप्रकाशदासजी यांनी उपस्थित हरिभक्तांना अन्नकुट महोत्सवाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व सांगत आशीर्वचन दिले.

या महोत्सवासाठी कोठारी शास्त्री स्वयंप्रकाशदास, शास्त्री धर्मकिशोरदास, शास्त्री भक्तीप्रियदास, शास्त्री विश्वप्रकाशदास, भंडारी शास्त्री माधवप्रियदास आणि पुजारी सत्यप्रकाशदास यांनी मन:पूर्वक परिश्रम घेऊन स्वादिष्ट व विविध ५६ भोग पदार्थांची व्यवस्था केली. मंदिर परिसर स्वामीनारायण युवक मंडळाने आकर्षकपणे सजविला तसेच परिसराची स्वच्छता करून दिवाळीचा उत्सवी माहोल निर्माण केला.

अन्नकुट आरती प्रसंगी कोठारी शास्त्री स्वयंप्रकाशदासजी, शास्त्री धर्मकिशोरदासजी, शास्त्री सत्यप्रकाशदासजी, शास्त्री भक्तीप्रियदासजी, भंडारी माधवस्वामी आणि शास्त्री विश्वप्रकाशदासजी यांच्यासह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने हरिभक्त उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मंदिर परिसरात हरिनामस्मरण, भजन आणि कीर्तनाचा आनंददायी माहोल अनुभवास आला.

आरतीनंतर उपस्थित सर्व भक्तांना वरणपोडी आणि वांग्याची भाजीचा महाप्रसाद देण्यात आला. भक्तीभाव, प्रसाद आणि सौहार्द यांचा संगम घडवणारा हा अन्नकुट महोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमादरम्यान झालेल्या अन्न कुटाचे यजमान दीपक भगत हे होते तर महाप्रसादाचे आयोजन शिवा भगत यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामीनारायण मंदिर सावदा यांचे तर्फे करण्यात आले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.