सावदा पोलिसांकडून आदिवासी पाड्यावर दिवाळी फराळ वाटप गरिबांच्या डोळ्यात आनंद
सावदा पोलिसांकडून आदिवासी पाड्यावर दिवाळी फराळ वाटप गरिबांच्या डोळ्यात आनंद
लेवाजगत न्यूज, सावदा प्रतिनिधी :दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण. याच भावनेतून सावदा पोलिस स्टेशनचे एपीआय विशाल पाटील यांनी एक वेगळी आणि हृदयस्पर्शी दिवाळी साजरी केली.
दिवाळी सणानिमित्त सावदा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या हदीतील मोह मंडळी, गारबर्डी या आदिवासी पाड्यांवर भेट देऊन पोलिसांनी तेथील गरजू कुटुंबांना फराळ, मिठाई व कपड्यांचे वाटप केले. स्थानिक आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून पोलिस दलालाही खऱ्या अर्थाने सणाचा आनंद अनुभवता आला.
एपीआय विशाल पाटील यांनी सांगितले की, “पोलिस वर्दीतून समाजसेवेची संधी मिळते. दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे हेच आमच्यासाठी खरी दिवाळी आहे.”
या उपक्रमामुळे सावदा पोलिस स्टेशनच्या कार्याचा मानवतेचा सुगंध सर्वत्र पसरला असून, “खाकी वर्दीतील करुणा आणि सेवाभाव” याचे सुंदर उदाहरण यावेळी पाहायला मिळाले.
#गरिबांच्या_डोळ्यातील_आनंद
#खाकी_वर्दीचे_समाधान
#सावदा_पोलिस_स्टेशन
#जळगाव_पोलिस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत