Header Ads

Header ADS

श्री स्वामिनारायण गुरुकुल सावदा येथे भव्य अन्नकूट महोत्सव! संतवाणी, भजनसंध्या व महाप्रसादाच्या सोहळ्याने आयोजन


shree-swaminarayan-gurukul-savda-anna-kut-mahotsav-santvani-bhajansandhya-mahaprasad



श्री स्वामिनारायण गुरुकुल सावदा येथे भव्य अन्नकूट महोत्सव!

संतवाणी, भजनसंध्या व महाप्रसादाच्या सोहळ्याने आयोजन

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी, सावदा :-सावदा येथील श्री स्वामिनारायण गुरुकुल संस्था येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने अन्नकूट महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. सर्वावतारी भगवान श्री स्वामिनारायण यांच्या कृपेने तसेच प.पू. धर्मधुरंधर १००८ आचार्यश्री राकेशप्रसादजी महाराज, अ.नि. सद्गुरु शा. श्री नीलकंठदासजी, सद्गुरु शा. स्वा. श्री धर्मप्रसाददासजी यांच्या आशीर्वादाने आणि संस्थेचे अध्यक्ष सद्गुरु शा. श्री भक्तिप्रकाशदासजी यांच्या प्रेरणेने हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.

मिती कार्तिक शु. १, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ (बुधवार) रोजी श्री स्वामिनारायण गुरुकुल परिसरात हा अन्नकूट महोत्सव साजरा होणार असून, भक्तांसाठी दर्शन, संतवाणी, भजनसंध्या आणि महाप्रसादाची सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे.

मांगलिक कार्यक्रमाचे वेळापत्रक :
गोवर्धनपूजा दुपारी ४ वाजता पार पडेल. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता अन्नकूट आरती, सायंकाळी ५ ते ५.३० वाजेपर्यंत भजनसंध्या, तर ५.३० ते ६.३० या वेळेत आशीर्वाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसाद सायंकाळी ६.३० ते ८ वाजेपर्यंत सर्व भाविकांसाठी ठेवण्यात आला आहे.

या प्रसंगी विविध संत-महंतांचा पावन मार्ग लाभणार असून, त्यात प.पू. सद्‌स्वामी श्री गोविंदप्रसाददासजी (जळगाव), श्री केशवप्रसाददासजी (साकेगाव), श्री धर्मस्वरुपदासजी (भुसावळ), श्री राजेंद्रप्रसाददासजी (यावल), श्री भगवत्स्वरुपदासजी (मोहराळा), श्री प्रेमप्रकाशदासजी (मालोद) आणि श्री जगतप्रकाशदासजी (सुनासावखेडे) यांचा सहभाग राहणार आहे.

कार्यक्रमात राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये रक्षाताई खडसे (केंद्रीय क्रिडा व युवा राज्यमंत्री, भारत सरकार), गिरीषभाऊ महाजन (जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य), संजय सावकारे (वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य), चंद्रकांतभाऊ पाटील (आमदार, मुक्ताईनगर), अमोलभाऊ जावळे (आमदार, रावेर), डॉ. सौ. केतकीताई पाटील (संचालिका, गोदावरी फाऊंडेशन, जळगाव), धनंजय चौधरी (प्रदेश काँग्रेस सरचिटणीस), बबनसाहेब काकडे (प्रांत अधिकारी, फैजपूर विभाग) आणि विशाल पाटील (पोलीस निरीक्षक, सावदा) यांचा सहभाग अपेक्षित आहे.

या अन्नकूट महोत्सवाचे महाप्रसाद यजमान प.भ. श्री अरविंद दगडू सराफ (यावल), प.भ. श्री अभय देवरे (यावल) आणि भ. श्री नितिन उखडू महाजन (यावल) असून, त्यांच्या सौजन्याने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

कार्यक्रमाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून, परिसरात भक्तिमय व सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाविक भक्तांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून अन्नकूट दर्शन, संतवाणी आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामिनारायण गुरुकुल संस्थेतर्फे करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.