Contact Banner

फैजपुर नगरपरिषदेत काँग्रेसचे दमदार शक्तीप्रदर्शन; नगराध्यक्ष पदासकट 8 जागांवर उमेदवारी, भाजप-महायुतीला तगडे आव्हान


 फैजपुर नगरपरिषदेत काँग्रेसचे दमदार शक्तीप्रदर्शन; नगराध्यक्ष पदासकट 8 जागांवर उमेदवारी, भाजप-महायुतीला तगडे आव्हान

लेवाजगत न्युज फैजपुर :

        फैजपुर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा आपली संघटनशक्ती आणि राजकीय ताकद दाखवत नगराध्यक्ष पदासाठी निलिमा केतन किरंगे यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. शहराच्या विकासाला गती देण्याच्या उद्दिष्टाने, काँग्रेसकडून 8 प्रभागांमध्ये अनुभवी, लोकप्रिय आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर उभे असलेले उमेदवार रिंगणात उतरले आहेत. आगामी निवडणुकीत भाजप व महायुतीसमोर काँग्रेसने मजबूत मुकाबल्याची रणनीती आखली आहे.

   नगरसेवक पदाचे काँग्रेस उमेदवार हकीम एमत तडवी,कलिम खान हैदर खान,सदीका बी शेख दानिश,

सुमैय्या नाज मुदस्सर नजर,मोमीन सुफिया बी शेख शरीफ,शेख इरफान शेख इकबाल,प्रियांका ईश्वर इंगळे

शेहेनाजबी शेख युसुफ

  फैजपुर हे शहर काँग्रेसची ऐतिहासिक आणि वैचारिक कर्मभूमी मानले जाते. भारतातील पहिले ग्रामीण काँग्रेस अधिवेशन याच फैजपुरमध्ये आयोजित करण्यात आल्याने काँग्रेसची मुळे शहरात घट्ट रोवली गेली. स्वातंत्र्यानंतरच्या नगरपरिषद इतिहासात फैजपुरकरांनी तीन टर्म वगळता नेहमीच काँग्रेस किंवा समविचारी नेतृत्वावर विश्वास टाकत नगराध्यक्ष निवडून दिले आहेत.

  मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या जास्त मतांच्या आघाडीमुळे, फैजपुरची राजकीय दिशा, विचारसरणी आणि जनमत स्पष्टपणे काँग्रेसकडे झुकलेले दिसते. शिक्षणाची गंगा म्हणून ओळख मिळवलेल्या शहराच्या प्रगतीत काँग्रेसने केलेल्या विकासकामांचा ठसा आजही जाणवतो, याची जाणीव फैजपुरकरांना आहे.

  यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून झालेल्या या दमदार शक्तीप्रदर्शनामुळे शहरातील निवडणुकीचे वातावरण तापले असून भाजप-महायुतीसमोर कठीण लढत उभी राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.