Contact Banner

धनाजी नाना महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यूद्वारे चार विद्यार्थ्याची नियुक्ती

 

धनाजी नाना महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यूद्वारे चार विद्यार्थ्याची नियुक्ती


धनाजी नाना महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यूद्वारे चार विद्यार्थ्याची नियुक्ती


लेवाजगत न्यूज फैजपूर:- येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल अंतर्गत ब्लूचिप इन्शुरन्स ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई या इन्शुरन्स कंपनीच्या वतीने कॅम्पस इंटरव्यूचे यशस्वी आयोजन करण्यात आले व त्यातून चार विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्र मिळून ते कंपनीला रुजू झाले.


या प्रक्रिये दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, श्री सुनील पाटील, टाटा लाईफ, विवेक विलायतकर रिजनल हेड ब्ल्यूचीप, मनोज दूरी सीनियर पर्सन ब्ल्यूचिप तथा पुणे व मराठवाडा हेड, श्री अमोल कोंडलकर ब्ल्युचिप स्टाफ यांच्यासहित प्रा डॉ डी बी तायडे समन्वयक प्लेसमेंट सेल, प्रा डॉ जी एस मारतळे, प्रा डॉ आय पी ठाकूर, प्रा डॉ मच्छिंद्र पाटील, कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांच्यासहित विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सेल्स एक्झिक्यूटिव्ह ( पुरुष ) व ब्रांच असिस्टंट (महिला) या पदांसाठी इयत्ता बारावी व पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मुलाखत प्रक्रिया पार पडली.

 यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुनील पाटील यांनी सांगितले की, तरुणांमध्ये विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांमध्ये प्रचंड कार्यक्षमता, बुद्धिमत्ता व मेहनत करण्याची चिकाटी आहे. यालाच अचूक मार्गदर्शन, सूक्ष्म नियोजन आणि सॉफ्ट व हार्ड स्किल विकसित करण्यावर भर दिल्यास ग्रामीण भागातील तरुणांसाठी करिअरची विविध संधी सहज उपलब्ध होऊ शकते. यासाठी पारंपारिक अभ्यासक्रम पूर्ण करतानाच विविध कौशल्य विकासनाची कोर्सेस करून वेगवेगळ्या मुलाखतींना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे आवाहन केले.

प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू साठी फैजपूर सारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयात आलेल्या ब्ल्यूचीप एक्झिक्यूटिव्ह मेंबर्स चे आभार मानले व विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे व करिअरची संधी प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव मोठे करावे असे आवाहन केले. 

सदर कॅम्पस इंटरव्यू मध्ये 43 विद्यार्थी- विद्यार्थिनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून त्यापैकी 

रोहिणी पुना पवार, अश्विनी सिताराम रोझोदे, हेमांगी कमलाकर पाटील व रोहिणी अनिल महाजन यांना नियुक्तीपत्र प्राप्त होऊन रुजू झाले.


यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट सेल अंतर्गत आयोजित मुलाखतीचा सकारात्मक फायदा झाला असून करिअरची संधी सोबतच आत्मविश्वासात वाढ, भाषा समृद्धी साठीचा प्रयत्न व न्यूनगंड कमी झाल्याची भावना व्यक्त केली.


 कॅम्पस इंटरव्यूच्या यशस्वी आयोजनासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी, उपाध्यक्ष आदरणीय प्रा डॉ. एस के चौधरी, उपाध्यक्ष आदरणीय श्री मिलिंद वाघुळदे, चेअरमन श्री लिलाधर विश्वनाथ चौधरी, सचिव प्राध्यापक एम टी फिरके, सहसचिव प्रा नंदकुमार आसाराम भंगाळे, व्यवस्थापन मंडळ सदस्य माजी प्राचार्य डॉ जी पी पाटील, श्री संजय काशिनाथ चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सहित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, उपप्रचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन व परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.