फैजपूर नगराध्यक्षपदी दामिनी पवन सराफ भाजपकडून उमेदवार; घराघर संपर्काला सुरुवात
फैजपूर नगराध्यक्षपदी दामिनी पवन सराफ भाजपकडून उमेदवार; घराघर संपर्काला सुरुवात
लेवा जगत न्यूज फैजपूर -फैजपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे दामिनी पवन सराफ यांना नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
उमेदवारी जाहीर होताच भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दामिनी सराफ आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांनी आपल्या-आपल्या प्रभागात घराघर संपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे. नागरिकांकडे प्रत्यक्ष जाऊन समर्थन मागत त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
‘प्रत्येकाशी संपर्क साधत आम्हाला विजयी करा,’ असे आवाहन करत सराफ या प्रत्येक वार्डात, प्रभागात आणि चौकाचौकात फिरत मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रचार मोहिमेत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्त्यांचीही सक्रिय उपस्थिती असून संपर्क अभियानाला अधिक वेग मिळत आहे.
दामिनी सराफ यांना उमेदवारी मिळाल्याने शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत