सावदा पालिका निवडणूक माघारीच्या अंतिम दिवशी मोठी माघार; शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशींची युतीधर्माने माघार
सावदा पालिका निवडणूक माघारीच्या अंतिम दिवशी मोठी माघार; शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशींची युतीधर्माने माघार
लेवाजगत न्यूज | सावदा :
सावदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने माघारीच्या अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीतून नंदाबाई मिलिंद लोखंडे आणि जयश्री बबन बडगे यांनी माघार घेतली. तसेच विविध प्रभागांतील उमेदवारांमध्ये आमिन रमजान तडवी, आमिर रशीद तडवी, रेखा राजेश वानखेडे, दगडू शहा करीम शहा, साईराज विजय वानखेडे, विजय पंडित तायडे, नीरज बळीराम सोनवणे, शेख शहरबानो नाझीम, हेमंत यशवंत इंगळे, खुशी प्रवीण नाथ जोगी, शेख अख्तर हुसेन शेख रहमान, मनीष यशवंत भंगाळे, शेख अजहर शेख अय्युब, शेख अहमद शेख रशीद, मनीष निळकंठ पाटील, तिलोत्तमा दुर्गादास भंगाळे, सुरज संतोषसिंग परदेशी, सुनिता संजय तायडे, वर्षा सतीश लोखंडे, लतेश रवींद्र चौधरी, वर्षा जगदीश बढे, चारू महेश बढे, गुणवंत सूर्यकांत वायकोळे, सुभाष धर्मा महाजन, सुरैय्या बानो दगडू शहा, रजियाबाद सुलेमान शहा फकीर आणि शेख फिरोज शेख फारुख या उमेदवारांनी देखील आज माघारी अर्ज दाखल केले.
यामुळे निवडणुकीत अनेक प्रभागांत स्पर्धेचे चित्र बदलले असून प्रभाग २ ब आणि प्रभाग १० ब बिनविरोध ठरले आहेत, तर प्रभाग ४ ब अपिलासाठी प्रलंबित आहे.
युतीधर्म पाळत शिवसेना शहरप्रमुखांची माघार
माघारी प्रक्रियेत सर्वाधिक लक्षवेधी ठरलेली बाब म्हणजे शिवसेनेचे शहरप्रमुख सुरज उर्फ बद्री परदेशी यांनी वरिष्ठांचे आदेश आणि भाजप-शिवसेना युतीधर्म जपण्यासाठी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी (भाजप) यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत आपले नामनिर्देशन मागे घेतले. यामुळे स्थानिक पातळीवर युती एकत्र येत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
– लेवा जगत न्यूज, सावदा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत