Contact Banner

जयश्री अतुल नेहेते प्रभाग ५ अ,भाजपा यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

Jayashree-Atul-Nehete-Ward-5-A,-Voters-spontaneous-response-to-BJP-campaign


जयश्री अतुल नेहेते प्रभाग ५ अ,भाजपा यांच्या  प्रचाराला
 मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लेवाजगत न्युज सावदा प्रतिनिधी -सावदा नगरपालिका निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीने प्रभाग क्रमांक ५- अ यामधून अधिकृत उमेदवार म्हणून सौ. जयश्री अतुल नेहेते यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या प्रचाराला स्थानिक मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास मूलभूत सुविधा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे

आपल्या संवादांमध्ये त्या सांगतात की

माझा उद्देश प्रभागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचविणे  महिलांच्या सुरक्षेसाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी ठोस उपक्रम राबविणे हा आहे  मतदारांचा आजवर दिलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायी असून पुढील पाच वर्षे शहराला विकासाची नवी दिशा देण्याचा माझा प्रयत्न असेल 

प्रभागातील प्रत्येक नागरिकांनी सौ नेहेते यांच्या होम टू होम  भेटीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सुविधा आणि महिला कल्याणाशी संबंधित विषयांवर त्यांनी मांडलेल्या योजनांचे कौतुक होत आहे

युतीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या प्रचार मोहिमेत जयश्री नेहेते यांनी मतदारांकडे  योग्य निर्णय घेऊन जास्तीत जास्त मतांनी विजय मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.