Contact Banner

नितीन पाटील व ललिता वायकोळे यांचा-प्रभाग क्रमांक ९ मध्ये युतीचा जंगी प्रचार, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

omvari-ratri-10-vajeperyant-nivadnuk-prachar-band


सावदा पालिका निवडणूक २०२५ — प्रभाग क्रमांक ९ मध्ये युतीचा जंगी प्रचार, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


सावदा लेवाजगत न्यूज  प्रतिनिधी — सावदा नगरपालिकेच्या महत्त्वाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ (अ) चे भारतीय जनता पार्टी – शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार नितीन नंदकुमार पाटील आणि प्रभाग ९ (ब) मधील उमेदवार ललिता गुणवंत वायकोळे यांच्या समर्थनार्थ आज शनिरोड, बुधवारा  आणि साळी बाग या परिसरात प्रचार दौरा व होम टू होम मतदारांशी संपर्क कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.


या प्रचार मोहिमेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत प्रभागातील समस्या व विकासाच्या अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी उपस्थितांनी दोन्ही उमेदवारांना भरघोस पाठिंबा दर्शवला. कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मतदारांना कमळ या निशाणीवर शिक्का मारण्याचे आवाहन करत युतीला विजय मिळवून देण्याचे आवाहन केले.

    या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक सुधाकर पाटील, नंदकुमार पाटील, बाजार समितीचे माजी संचालक पंकज येवले यांच्यासह शेकडो महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारातील या उत्साहपूर्ण सहभागामुळे युती उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.


याच वेळी नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी – शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवार सौ. रेणुका राजेंद्र पाटील यांना सहकार्य करण्याचे आणि त्यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळीं माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांचीही विशेष उपस्थिती लाभली.


प्रचारामध्ये कार्यकर्त्यांनी नागरिकांना आगामी निवडणुकीत

👉 कमळ (भारतीय जनता पार्टी)या चिन्हांवर विश्वासाने मतदान करून युतीला मजबूत करण्याचे आवाहन केले.

निवडणूक जवळ येताच प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रचार जोर पकडत असून, युती उमेदवारांना मिळणारा जनसमर्थनाचा वाढता प्रतिसाद पाहता विजयी होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.


लेवा जगत न्यूज — सावदा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.