सचिन चुडामन बर्हाटे प्रभाग ५-अ भाजपा, यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा विजयाकडे वाटचाल मजबूत
सचिन चुडामन बर्हाटे प्रभाग ५-अ भाजपा, यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा विजयाकडे वाटचाल मजबूत
लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी) :- सावदा नगरपालिका निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक ५-अ मधून भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार सचिन चुडामन बर्हाटे यांच्या प्रचाराला मतदारांकडून प्रचंड उत्साह आणि भरभरून आशीर्वाद मिळत आहे
समाजकार्यातील सक्रिय योगदान धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांत सततची उपस्थिती तसेच नागरिकांच्या छोट्या मोठ्या समस्यांसाठी तत्पर मदत या गुणांमुळे सचिन बर्हाटे यांना प्रभागातील सर्वच घटकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे दारोदारी भेटी दरम्यान मतदारांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले असून प्रभागातील विकासकामे स्वच्छता पाणीपुरवठा, रस्ते ,भूमिगत गटारी आणि सामान्य नागरिकांच्या सुविधा याबाबत त्यांची पुढाकार आणि विचारधारा नागरिकांना विश्वास देणारी असल्याचे मतदार सांगत आहेत प्रचार दौऱ्यात मतदारांनी विकासासाठी योग्य उमेदवार म्हणून त्यांचा विचार मांडत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे
सचिन बर्हाटे यांना विजय मिळवून देण्यासाठी मतदार एकदिलाने समर्थन देत आहेत, अशी जनमानसाचे वातावरणात चर्चा आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत