कामाच्या शोधात आला महाराष्ट्रात… पण दुर्दैवाने पहिल्याच दिवशी अंत!
कामाच्या शोधात आला महाराष्ट्रात… पण दुर्दैवाने पहिल्याच दिवशी अंत!
लेवाजगत न्युज | मुंबई :
रायगडच्या रेवदंडा बंदर किनाऱ्यावर एका हृदयद्रावक घटनेत उत्तर प्रदेशातील प्रदीप कमजोरी गौतम (वय ३०) या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.
‘जय भवानी’ या मच्छिमारी बोटीवर नुकताच कामाला लागलेला प्रदीप हा पहिल्याच दिवशी समुद्रात गेला आणि परतला नाही.
३१ ऑक्टोबरच्या रात्री मासेमारीदरम्यान तो अचानक बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आंग्रेनगर समुद्रकिनारी सापडला.
पोलीसांनी ही घटना अपघाती बुडाल्याची असल्याचे म्हटले असले तरी मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
या घटनेमुळे रेवदंडा परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक मच्छिमारांनी नवीन कामगारांच्या सुरक्षेवर अधिक लक्ष देण्याची मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत