Contact Banner

टीम इंडियाने वनडे वर्ल्डकपवर कोरलं नाव! पहिल्यांदाच जिंकली स्पर्धा

 


टीम इंडियाने वनडे वर्ल्डकपवर कोरलं नाव! पहिल्यांदाच जिंकली स्पर्धा
 

लेवाजगत न्युज प्रतिनिधी:
भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवत वनडे वर्ल्डकपचे जेतेपद आपल्या नावावर केलं आहे! अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, आफ्रिकन संघ केवळ 246 धावांवरच गारद झाला आणि भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. 

ही भारताची पहिलीच वनडे वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी ठरली. यापूर्वी 2005 आणि 2017 साली भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली होती, पण दोन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेर तिसऱ्या प्रयत्नात भारताने इतिहास रचला!

या विजयानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष सुरू झाला आहे.
शफाली वर्मा हिने शानदार खेळी करत फलंदाजीत आणि गोलंदाजीत मोलाचं योगदान दिलं. तिच्या कामगिरीमुळे भारताला निर्णायक विजय मिळवता आला.

शेफाली आणि स्मृती मानधानाची विक्रमी भागीदारी


नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय महिला संघाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर स्मृती मानधाना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी रचली. दोघींनी जबाबदारीने खेळ करत संघाला मजबूत पाया दिला. ही जोडी आणखी मोठी भागीदारी करेल असं वाटत असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत मंधानाला 45 (58) धावांवर माघारी पाठवलं.



30व्या षटकात दीप्ती शर्माने जाफ्टाला 16 धावांवर बाद करत दक्षिण आफ्रिकेला पाचवा धक्का दिला. त्यानंतर 40व्या षटकात दीप्तीने आणखी एक महत्त्वाचा विकेट घेतला, एनेरी डर्कसन 35 धावांवर बाद झाली. 42व्या षटकात दीप्तीने भारताला सर्वात मोठे यश मिळवून दिले. तिने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्टचा शतकानंतरचा मौल्यवान विकेट घेतला. याच षटकात तिने ट्रायोनलाही बाद केले आणि विजय भारताच्या झोळीत घातला. दीप्ती शर्माने या सामन्यात तब्बल 5 विकेट घेतल्या आणि एक रनआउटही केला. तिच्या या अफलातून कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेची संपूर्ण टीम 246 धावांवरच गारद झाली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.