निवृत्तीनंतरही विद्यार्थीदशेचाअनुभव घेणारे प्रल्हाद कोलते सर
निवृत्तीनंतरही विद्यार्थीदशेचाअनुभव घेणारे प्रल्हाद कोलते सर
उल्हासनगर:(लेवाजगत न्यूज प्रतिनिधी:सुनील इंगळे) माणूस शेवटपर्यंत शिकतच असतो शिक्षणासाठी जिद्द, चिकाटी आणि दुसऱ्याचं ऐकून घेण्याची क्षमता लागते याचा त्रिवेणी संगम म्हणजे आदरणीय श्री.प्रल्हाद रावजी कोलते.याच तत्त्वांना त्यांनी सार्थ ठरवले आहे. सरांनी यशवंत विद्यालय, माध्यमिक,उल्हासनगर-४ येथे ३३ वर्षे शरीरिक शिक्षक रूपाने शिस्तप्रियआणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून सेवा करीत असतांना शाळेला एक वेगळी ओळख प्राप्त करून दिली,त्या नंतर सेवाजेष्ठतेने त्यांना १वर्षाच्या काळासाठी १जून२०२३ रोजी मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळाली,शासन नियमानुसार सदर पदासाठी शालेय व्यवस्थापन पदविका प्राप्त करणेआवश्यकअसते म्हणून त्यांनी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात गुरुकृपा कॉलेजऑफ एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या डी.एस.एम.या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली
हि बातमी ऑनलाईन वाचा -सावदा पालिका निवडणुकीत रेणुका राजेंद्र पाटील यांचा विकासाचा जाहीरनामा चर्चेत; भाजप–शिवसेना युतीचा प्रचार जोरात https://www.lewajagat.com/2025/11/savda-palika-election-renuka-patil-bjp-shivsena-yuti-vikas-aghadi-campaign-2025.html
वर्षभर शालेय व्यवस्थापन सांभाळून सदर अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला अगदी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी शेवटचा पेपर दिला, आणिआता सेवानिवृत्ती नंतर दिड वर्षांनी त्यांना पदवी प्रमाणपत्र प्राप्त झाले.महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.कोल्हे मॅडम यांच्या हस्ते त्यांनी सदर प्रमाण पत्र स्विकारले.या डीग्रीचा आता उपयोग नसला तरी ते प्राप्त केल्याच समाधान मात्र निश्चितच आहे.विद्यार्थीदशेचा आनंद पुन्हा घेता आला त्या बद्दल मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांना धन्यवाद देत आपल्यातील नम्रपणा अजूनही कायम आहे याची जणू साक्षच दिली आहे.या पूर्वी त्यांनी साहित्याची आवड असल्याने कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांची साहित्य भूषण ही पदवी सुद्धा संपादन केली आहे.ते मराठी,हिंदी,लेवा गणबोली या भाषां मधून कविता लिखाण करतात त्यांनी आज वर किमान ७०० पेक्षा अधिक कविता लिहील्या आहेत. पुस्तक प्रकाशन अद्याप केलेले नाही ते लवकरच प्रकाशीत होईल अशी त्यांची अपेक्षा आहे . त्यांनी सेवारत असतांना आणि आता सेवानिवृत्ती नंतरच्या जीवनात सुद्धा सामाजिक बांधीलकेचे भान ठेवून विविध सामाजिक,शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात देखील आपल्या कार्यातून एक छाप निर्माण केलेली आहे जसे महाराष्ट्र साहित्य परिषद उल्हासनगर शाखेचे अनेक वर्षे ते प्रमुख कार्यवाह असून कोकण मराठी साहित्य परिषद उल्हासनगर शाखा स्थापने पासून आज पर्यंत कार्यरत आहेत,बहिणाबाई साहित्य परिषद-डोंबिवली या संस्थेत सुध्दा ते सक्रीय आहेत त्यांनी उल्हासनगर महापालिका जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या समिती मध्ये अनेक वर्षे कार्यकारी सदस्य म्हणून काम केले आहे.महापालिका शिक्षण समिती द्वारा आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये १९९५ पासून मागील वर्षा पर्यंत मोलाची भूमिका पार पाडलेली आहे त्यांना अनेक साहित्यिक व आदर्श शिक्षक पुरस्कार लाभले आहेत. त्यांनी वै.ह.भ.प.तोताराम महाराज लेवा पाटीदार उत्कर्ष मंडळ,मुंबई परिसर या संस्थेचे विविध पदे भूषविली असून विद्यमान अध्यक्ष आहेत. उल्हासनगर स्वागत यात्रा आयोजनांमध्ये सुध्दा त्यांचे मोलाचे योगदान राहीले आहे त्यांनी क्रीडा शिक्षकांना न्याय मिळावा कार्यात नाविण्य यावे म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष या पदाच्या माध्यमातून त्यांनी संघटनात्मक कार्यात योगदान दिलेले आहे.अशा याअष्टपैलू व्यक्तिमत्त्वास समाजातील समाज बांधव व मित्र परिवारांनी त्यांचे अभिनंदन व्यक्त करून,अशीच यशाची शिखरे पदाक्रांत करावी अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत