Contact Banner

सावदा पालिका निवडणुकीत रेणुका राजेंद्र पाटील यांचा विकासाचा जाहीरनामा चर्चेत; भाजप–शिवसेना युतीचा प्रचार जोरात

 

savda-palika-election-renuka-patil-bjp-shivsena-yuti-vikas-aghadi-campaign-2025


सावदा पालिका निवडणुकीत रेणुका राजेंद्र पाटील यांचा विकासाचा जाहीरनामा चर्चेत; भाजप–शिवसेना युतीचा प्रचार जोरात

लेवाजगत न्यूज सावदा:-  सावदा पालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असून नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी – शिवसेना (शिंदे गट) युतीकडून सौ. रेणुका राजेंद्र पाटील या अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात आहेत. संपूर्ण शहरात तसेच प्रभागातील युतीच्या उमेदवारांसह कमळ चिन्हावर त्यांचा प्रचार उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून शहरातील नागरिकांचा वाढता पाठिंबा त्यांना लाभताना दिसत आहे.


ही बातमी वाचा -सावदा -प्रभाग १ ‘अ’ मध्ये ममता रशीद तडवी यांची धडाकेबाज प्रचारमोहीम; स्वच्छ-सुंदर सावदा व अंडरग्राउंड सांडपाणी योजनेवर भर  https://www.lewajagat.com/2025/11/savda-nagarparishad-prabhag-1a-mamta-rashid-tadvi-prachar-vikas-underground-sandapani-yojana.html

रेणुका पाटील या मतदारांशी संवाद साधताना विकास हा आपला मुख्य मुद्दा असल्याचे स्पष्ट करत आहेत. “सावदा प्रथम – विकासाच्या प्रत्येक पावलावर” या घोषवाक्याने त्यांनी शहराच्या सर्वांगीण उभारणीचा संकल्प मांडला आहे. त्यांच्या प्रमुख विकास योजना खालीलप्रमाणे मांडण्यात आल्या :


 रेणुका पाटील यांचा विकास आराखडा

पाणीपुरवठा प्रणालीची सुधारणा व शुद्ध पिण्याच्या पाण्याची हमी

शहरातील स्वच्छता, नियमित नालेसफाई व खड्डेमुक्त रस्ते

पावसाळ्यातील पूरपरिस्थिती नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना

महिला व नागरिक सुरक्षा यासाठी स्वतंत्र उपक्रम

सक्षम आरोग्य सेवा व स्थानिक आरोग्य सुविधा वाढविणे

शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा

वाहतूक शिस्त, सुसज्ज पार्किंग व्यवस्था

शहर सुशोभीकरण, उद्याने, क्रीडा संकुले

पर्यावरण संवर्धन, ग्रीन सिटी उपक्रम

भटके प्राणी नियंत्रणासाठी स्थायी प्रकल्प

युवांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम आणि कौशल्य विकास कार्यक्रम

जेष्ठ नागरिकांसाठी सेवा व सुविधा

नागरिक तक्रार निवारणाची जलद प्रणाली

रेणुका पाटील यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले की, “पूर्ण बहुमत म्हणजे संपूर्ण विकास. सावदा शहराला आधुनिक, सुव्यवस्थित आणि सुरक्षित शहरात रूपांतरित करणे हेच आमचे ध्येय आहे.”


त्यांच्या प्रचार मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून गावोगाव, वाड्यावस्त्यांमध्ये ‘कमळा’चा प्रचार जोमात सुरू आहे. युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रचाराला मोठी गती मिळत असून आगामी निवडणुकीत त्यांना शहरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.