Contact Banner

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर भाजप उमेदवारांची प्रचार आढावा बैठक

 

fajpur-bjp-campaign-review-meeting-led-by-union-minister-raksha-khadse


केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर भाजप उमेदवारांची प्रचार आढावा बैठक

लेवाजगत न्यूज फैजपूर -नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रचार नियोजनाला वेग देण्यासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. फैजपूर (यावल) मंडळातील सर्व सन्माननीय भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नेतृत्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ही बातमी पण वाचा-सावदा पालिका निवडणुकीत रेणुका राजेंद्र पाटील यांचा विकासाचा जाहीरनामा चर्चेत; भाजप–शिवसेना युतीचा प्रचार जोरात >> https://www.lewajagat.com/2025/11/savda-palika-election-renuka-patil-bjp-shivsena-yuti-vikas-aghadi-campaign-2025.html

बैठकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी घोषित भाजपा अधिकृत उमेदवारांच्या एकूण प्रचार आराखड्याचा सखोल मागोवा घेण्यात आला. घराघर संपर्क मोहीम प्रभावी करण्यासाठी आवश्यक धोरणांवर चर्चा झाली. तसेच बूथ-स्तरीय संघटन, प्रत्येक प्रभागानुसार मुद्द्यांची रूपरेषा, मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या विविध माध्यमांचा वापर याबाबतही तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले.


श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रचारामध्ये शिस्त, वेग आणि समन्वय यांची आवश्यकता अधोरेखित करत उमेदवार व कार्यकर्त्यांना विकासाभिमुख राजकारणाचा संदेश घराघरामध्ये पोहोचविण्याचे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे बैठकीत उपस्थितांनी व्यक्त केले.

भाजपकडून फैजपूरसाठी पुढील विकासनिश्चय जाहीर करण्यात आला —

🔹 पारदर्शक, जबाबदार व उत्तरदायी प्रशासन

🔹 सर्व प्रभागांत समसमान विकास

🔹 मूलभूत नागरी सुविधांचे दर्जात्मक उन्नतीकरण

🔹 महिलां, युवक आणि ज्येष्ठांसाठी उपयुक्त उपक्रम

🔹 स्थिर, सक्षम आणि वेगवान फैजपूर उभारणी


ही बातमी पण वाचा -सावदा -प्रभाग १ ‘अ’ मध्ये ममता रशीद तडवी यांची धडाकेबाज प्रचारमोहीम; स्वच्छ-सुंदर सावदा व अंडरग्राउंड सांडपाणी योजनेवर भर >> https://www.lewajagat.com/2025/11/savda-nagarparishad-prabhag-1a-mamta-rashid-tadvi-prachar-vikas-underground-sandapani-yojana.html


फैजपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी ‘कमळ’ चिन्हासमोरील बटण दाबून विश्वास व्यक्त करावा, असे आवाहन बैठकीतून करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.