सावदा येथे भाजपा-शिवसेना युतीकडून मंगळवार रोजी उमेदवार घोषणेची पत्रकार परिषद
सावदा येथे भाजपा-शिवसेना युतीकडून मंगळवार रोजी उमेदवार घोषणेची पत्रकार परिषद
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी - सावदा सावदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीकडून सर्व उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात येणार असून, त्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही पत्रकार परिषद दि. 18 नोव्हेंबर 2025 (मंगळवार) रोजी दुपारी 1.00 वाजता, श्री नंदकुमार मुकुंदा पाटील यांच्या बुधवार पेठ येथील निवासस्थानी पार पडणार आहे. पक्षाकडून सर्व पत्रकार बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
युतीकडून होणाऱ्या या घोषणेने सावद्यातील निवडणूक वातावरण आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. उमेदवारांची अधिकृत नावे जाहीर झाल्यावर स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण येणार आहे.
दरम्यान, या पत्रकार परिषदेची सविस्तर बातमी लेवा जगत यूट्यूब न्यूज चॅनलवर काल दुपारी 3.00 वाजता प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती लेवाजगतच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांनी आणि पत्रकार बांधवांनी ही बातमी अवश्य पाहावी, असे आवाहन लेवा जगत चॅनलने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत