Contact Banner

‘माझी लाडकी बहिण’ योजनेच्या ई-केवायसीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ

 

mukhyamantri-mazi-ladki-bahin-yojana-ekyc-mudat-31-december-2025-paryant-vadh

‘माझी लाडकी बहिण’ योजनेच्या ई-केवायसीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ

लेवा जगत न्यूज मुंबई- राज्यात सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलीकडील नैसर्गिक आपत्ती व महिलांनी व्यक्त केलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये ई-केवायसीची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ वरून वाढवून आता ३१ डिसेंबर २०२५ करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अपूर्ण ई-केवायसीस मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पती/वडील हयात नसलेल्या किंवा घटस्फोटित महिलांनी ई-केवायसी करताना मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालय आदेशाची सत्यप्रत सादर करावी लागणार आहे.

कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणामुळे योजनेपासून वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.
विस्तारित कालावधीत सर्व पात्र महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

लेवा जगत न्यूज प्रतिनिधी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.