Contact Banner

सावदा नगरपालिका निवडणूक २०२५ नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार — अलका बबन बडगे यांचा प्रचार जोरात

 

savda-nagarapalika-nivadnuk-2025-apaksh-alkababan-badge-nagaradhyaksh


सावदा नगरपालिका निवडणूक २०२५
नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार — अलका बबन बडगे यांचा प्रचार जोरात


लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी) :सावदा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून अलका बबन बडगे या दमदारपणे मैदानात असून, आपल्या समर्थकांसह आणि कार्यकर्त्यांसह त्या घराघरात जाऊन मतदारांशी संपर्क साधत मतांची विनंती करीत आहेत.


अलका बडगे या प्रचाराच्या दरम्यान मतदारांना आवाहन करताना म्हणाल्या —

 “सावदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मला एक संधी द्या. आपल्या बहुमूल्य मतांनी मला नगराध्यक्षपदी विराजमान करा. शहराच्या प्रगतीसाठी समर्पित सेवा करण्याची माझी तयारी आहे.”


प्रचारात त्यांच्या पतीसोबत त्या प्रत्येक भागात गाठीभेटी घेत असून, महिलांसह तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.


त्यांचे पती बबन बडगे हे शिवनेरी बँडचे संचालक असून, त्यांचा शहरात मोठा जनसंपर्क असल्याने या निवडणुकीत अलका बडगे यांच्या नावाची चर्चाही मोठ्या प्रमाणात होत आहे.


मतदारांशी सलग संपर्क, प्रामाणिक व विनम्र संवाद या माध्यमातून अलका बडगे यांची निवडणूक लढत अधिकच रंगतदार झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.