Contact Banner

सावदा पालिका प्रभाग ५-ब मध्ये अजय भारंबे यांचा जोरदार जनसंपर्क! अपक्ष उमेदवाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  

ajay-bharambe-independent-candidate-prabhag-5b-sawda-election-2025

सावदा पालिका प्रभाग ५-ब मध्ये अजय भारंबे यांचा जोरदार जनसंपर्क! अपक्ष उमेदवाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लेवाजगत न्यूज सावदा :- सावदा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग ५-ब मधून माजी नगरसेवक अजय भागवत भारंबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहताच त्यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. नामनिर्देशन पत्र भरल्यापासूनच अजय भारंबे यांनी आपल्या प्रभागातील जनसंपर्क मोहीम वेगाने सुरू केली आहे.

अजय भारंबे हे प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन “भेटून-भेटून संवाद” साधत आहेत. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून प्रत्यक्ष आशीर्वाद घेत असून गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांची पावती नागरिकांसमोर मांडत आहेत. आपल्या कार्यकाळातील प्रामाणिक व पारदर्शक कामाच्या आधारे ते मतदारांकडून विश्वास आणि मत मागत आहेत.

जनतेमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी अजय भारंबे यांचे स्वागत नागरिकांकडून प्रेमाने होत आहे. प्रभागातील समस्या, विकासकामे आणि नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ते घराघर भेटी देत आहेत.

अजय भारंबे म्हणतात —

“गेल्या पाच वर्षांत आपण केलेले काम हेच माझे ओळखपत्र आहे. पुन्हा एक संधी दिल्यास प्रभाग ५-ब आणखी विकसित, सुव्यवस्थित आणि स्वच्छ करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन.”

मतदारांना भेटून त्यांनी विजयी करण्याचे आवाहन केले असून प्रभागात त्यांचा जनसंपर्क दररोज वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.