Contact Banner

सावद्यात दिपाली धांडे यांचा दमदार प्रचार! शहरभर जनसंपर्काला वेग—विकासाच्या आश्वासनाने मतदारांमध्ये उत्सुकता

 

dipali-dhande-independent-candidate-sawda-development-campaign-2025


सावद्यात दिपाली धांडे यांचा दमदार प्रचार! शहरभर जनसंपर्काला वेग—विकासाच्या आश्वासनाने मतदारांमध्ये उत्सुकता

लेवाजगत न्यूज | सावदा प्रतिनिधी-

सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केलेल्या दिपाली राहुल धांडे यांनी शहरभर आपला जनसंपर्क जोरदारपणे सुरू केला असून आगामी निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे.

लेवा पाटीदार समाजातील एससी महिला उमेदवार म्हणून दिपाली धांडे यांनी माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, विविध वाड्यांतील रहिवासी तसेच समाजबांधवांचे आशीर्वाद घेत घरोघरी भेटी सुरू केल्या आहेत. त्यांचे पती राहुल धांडे सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात सक्रिय असल्याने शहरात त्यांचा ठोस जनसंपर्क दिपाली धांडे यांच्या प्रचाराला बळ देत आहे.

त्यांच्या संपर्क मोहिमेत शहरातील काही अपक्ष उमेदवारही सहभागी होत असून सामूहिक प्रचारामुळे वातावरणात अधिक उत्साह निर्माण झाला आहे. यामुळे दिपाली धांडे यांनी प्रचारात लक्षणीय आघाडी घेतली असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

दिपाली धांडे यांची शहर विकासासाठी स्पष्ट भूमिका

संपर्क मोहिमेदरम्यान दिपाली धांडे यांनी सावदा शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविणे, शहर सुंदर व स्वच्छ ठेवणे, तसेच दर्शनीय भाग आकर्षक बनविणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे.


दीपाली धांडे म्हणतात की

“सावदा शहराची ओळख पुनर्स्थापित करणे, शहराला नवीन रूप देणे आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधांचा विस्तार करणे हे आमचे प्राधान्य असेल. नागरिकांचा पाठिंबा मिळाला तर सावदाला मॉडेल टाऊन बनवण्यासाठी आम्ही सर्वसमावेशक कामे करणार आहोत.”

शहरातील रस्ते, नाली व्यवस्था, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, बाजारपेठेतील वाहतूक व स्वच्छता या मुलभूत प्रश्नांवर तातडीने काम करण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला आहे.

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दिपाली धांडे यांच्या प्रचाराला शहरातील नागरिक, वाड्यातील रहिवासी आणि विविध समाजघटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून “त्यांचा विजय निश्चित” अशी चर्चा मतदारांमध्ये वाढत आहे. अपक्ष म्हणून लढत असूनही मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे त्यांची उमेदवारी अधिक बळकट होताना दिसत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.