स्वामिनी फाउंडेशन आयोजित लेवा सखी घे भरारी तर्फे हेल्थ कॅम्प
स्वामिनी फाउंडेशन आयोजित लेवा सखी घे भरारी तर्फे हेल्थ कॅम्प
लेवाजगत प्रतिनिधी (खेमचंद पाटील):-
जळगांव येथे स्वामिनी फाउंडेशन आयोजित लेवा सखी घे भरारी तर्फे हेल्थ कॅम्प २० ,२१ आणि २२ नोव्हेंबर तीन दिवशीय महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महिला संपूर्ण परिवाराची काळजी घेत असते पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यास सातत्याने नियमित हलगर्जीपणा करीत असतात म्हणून स्वतःची काळजी महिलांनी घ्यायला हवी त्यानिमित्ताने या शिबिरात ॲक्युप्रेशर, निसर्गोपचार, योग ,कपिंग, मोकसा ,माती चिकित्सा, व्हायब्रो मसाज , पाणी चिकित्सा अशा विविध प्रकारे विविध आजारानुसार उपचार करण्यात आले या उपचारात्मक शिबिरात डॉ.भावना चौधरी, डॉ निशिगंधा नेमाडे, डॉ पूजा महाजन, योग प्राध्यापक चित्रा महाजन यांनी महिलांची तपासणी करून त्यांच्या व्याधीनुसार त्यांच्यावर उपचार करत त्यांना मार्गदर्शन केले.
तिसऱ्या दिवशी या महिला उपस्थित राहिल्या त्या महिलांना तीन दिवसात जे फरक जाणवले ते शब्दात मनोगत व्यक्त करत समाधान व्यक्त केले. त्यात त्यांनी खूप छान वाटले व दुखण्यात खुप फरक पडल्याचे सांगितले व असे शिबिर वारंवार आयोजित करावे त्यामुळे आजाराबाबत आम्ही पण स्वतःची काळजी घेतो असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष ॲड भारती ढाके , डॉक्टर स्मिता पाटील, संगीता पाटील, रोहन चौधरी जयश्री पाटील राजश्री वाणी या सर्व महिलांनी आरोग्य हेच जीवन हा मंत्र देत. आरोग्य विषयी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी सूत्रसंचालन सविता भोळे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत