सावदा नगरपालिका निवडणूक २०२५ प्रभाग क्रमांक १ अ व १ ब — तरुण उमेदवारांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावदा नगरपालिका निवडणूक २०२५
प्रभाग क्रमांक १ अ व १ ब — तरुण उमेदवारांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लेवाजगत न्यूज सावदा, प्रतिनिधी — सावदा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या रेणुका राजेंद्र पाटील व प्रभाग क्रमांक १ अ व १ ब येथून भारतीय जनता पार्टी–शिवसेना (युती) तर्फे घोषित करण्यात आलेले तरुण अधिकृत उमेदवारसौ. भावना एकलव्य कोल्हे (प्रभाग १ अ) नवाज रमजान तडवी (प्रभाग १ ब)
यांनी सोमवारी प्रभागातील विविध परिसरात दणदणीत प्रचार दौरा राबवून मतदारांशी थेट संवाद साधला.
हाउसिंग सोसायटी, स्वामीनारायण नगर, स्टेट बँक परिसर, महावीर चौक, प्लॉट एरिया अशा महत्त्वाच्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत मतदारांचा विश्वास संपादन करत त्यांनी आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी–शिवसेना युतीला विजयी करण्याचे आवाहन केले.
🔸 भावना एकलव्य कोल्हे व नवाज रमजान तडवी यांनी या वेळी सांगितले की,
“भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्ष पदाच्या रेणुका राजेंद्र पाटील व प्रभाग क्रमांक १ मध्ये संधी मिळालेल्या या तरुण पिढीच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही विकासाला नवी दिशा देण्याचे ध्येय ठरविले आहे. स्वच्छ व सुंदर सावदा, दर्जेदार पाणीपुरवठा, रस्ते व पायाभूत सुविधा, महिलांसाठी सुरक्षा आणि रोजगार निर्मिती या प्रमुख मुद्द्यांवर काम करू. मतदारांचा विश्वास आमचे मोठे बळ आहे आणि आपण दिलेल्या प्रत्येक मताचा मान आम्ही नक्कीच राखू.”
प्रचार दौऱ्यात परिसरातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. नागरिकांनी उमेदवारांना भरभरून आशिर्वाद देत मोठा पाठिंबा दर्शविला. प्रभागात युतीच्या उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता युतीच्या बाजूने जोरदार लाट निर्माण झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
सावदा नगर निवडणूक आता चुरशीची झाली असून प्रभाग क्रमांक १ अ व १ ब मध्ये तरुण उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत