लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त पिंपरुड येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त पिंपरुड येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी, पिंपरुड :
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पिंपरुड येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीचे अध्यक्ष अमित पाटील तर उपाध्यक्ष सचिन चौधरी होते. तसेच सदस्य म्हणून सौरभ चौधरी, प्रशांत चौधरी आणि हेमंत नेहते यांनीही मिरवणुकीत सक्रिय सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. धीरज भागवत चौधरी (चौधरी हॉस्पिटल, यावल) होते. यावेळी जय लेवा ग्रूप, पिंपरुड मधील सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुकीदरम्यान “जय श्री राम” च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. गावात देशभक्तीचा व ऐक्याचा संदेश देत सरदार पटेल यांच्या विचारांचा जागर जागी गौरव करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत