Contact Banner

भा.ज.पा. नेतृत्वाचा नंदुभाऊ महाजन यांच्यावर पुन्हा विश्वास — रावेर लोकसभा क्षेत्रातील जळगाव पूर्व जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती

 

bjp-appoints-nandubhau-mahajan-as-election-chief-jalgaon-east-raver-lok-sabha


भा.ज.पा. नेतृत्वाचा नंदुभाऊ महाजन यांच्यावर पुन्हा विश्वास — रावेर लोकसभा क्षेत्रातील जळगाव पूर्व जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती



लेवाजगत न्यूज जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने पुन्हा एकदा कार्यकुशल, संघटनप्रिय आणि जनसंपर्कात निपुण अशा श्री. नंदकिशोर (नंदुभाऊ) महाजन यांच्या कार्याची दखल घेत, त्यांची स्थानिक स्वराज संस्था रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत जळगाव पूर्व "जिल्हा निवडणूक प्रमुख" म्हणून नियुक्ती केली आहे.


ही नियुक्ती भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, या निर्णयामुळे रावेर लोकसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


नंदुभाऊ महाजन यांनी यापूर्वीही पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत संघटन बळकट केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुकीत पक्षाला यश मिळाले असून, ते पक्षनिष्ठा, कार्यतत्परता आणि लोकसंपर्कासाठी ओळखले जातात.


या नव्या जबाबदारीबद्दल रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


— ✍️ लेवा जगत न्यूज, जळगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.